¡Sorpréndeme!

अर्ज दाखल केल्यानंतर 9 जागांबद्दल काय म्हणाले सतेज पाटील | Sakal Media |

2021-11-29 3,381 Dailymotion

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी गगनबावडा तालुक्यातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बॅंकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळाने सातत्याने केलं आहे. सध्या गगनबावडा येथील ६६ मतदार आहेत, त्यातील ४६ मतदार सोबत आहेत. अजून तीन मतदार आमच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे एकूण ४९ मतदारांची आकडेवारी गाठू असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. यावेळी ते बोलत होते
#satejpatil #politics #maharastra #sakal